बाल विवाहाच्या प्रथे विरोधात देशभरात वेगवेगळ्या पातळ्यांवर जाणीव जागृती सुरु असली तरीही थांबवण्यात यश आलेले नाही। त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळ वता आले असले तरी ते अद्याप पुरेसे नाही ,हे जनगणनेतील आकडेवरीवरून स्पष्ट झाले आहे। लग्न होणाऱ्या मुलींपैकी एक तृतीयांश मूली अल्पवयीन म्हणजे १८ वर्षाखालील असतात, असे सांगतो अर्थात ,ही आकडेवारी ४ वर्षपूर्वीची असली तरी ४ वर्षात फार मोठे परिवर्तन घडले असेल नाही। मूली शिकत आहेत,मूली विमान भरारी घेत आहेत ,मोठ मोठी सत्ता पदे काबिज करत आहेत हे जरी खरे असले तरी मुलींच्याकडे पाहण्याचा समाजाचा पारंपरिक दृष्टिकोण सहजासहजी बदलणार नाही ,हे आसपासच्या अनेक घटनांवरून दिसते। 'बेटी बढ़ाओ बेटी पढ़ाओ 'म्हणजे केवळ गर्भातल्या मूली वाचवणे नव्हे तर मुलींचा योग्य विकास होईल याकडे लक्ष देणे। परंतु समाज्याच्या काहि घटकांमध्ये वयात आलेली मुलगी ओझे वाटावी आणि हे परक्याचे धन मानून तिचे लवकरात लवकर लग्न लाउन द्यावे अशी मानसिकता दिसते। आर्थिक स्तिथि ,शिक्षणाचा आभाव ,मुलींच्या सुरक्षिततेची चिंता अशी अनेक कारणे त्यामागे असतात। लग्नात मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ पेक्षा कमी असू नये ,असे कायदा सांगतो। कायद्याच्या अमलासाठी सरकारने गावोगाव यंत्रणा दक्ष केल्या आहेत। त्याचा परिणाम म्हणून बालविवाहची संख्या गेल्या दोन ही घट पुरेशी नसल्याचे अहवालावरून दिसते। कमी वयात गर्भधारण झाली तर बाळाच्या पोषणासाठी सक्षम नसलेले शरीर ,घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरा आहार या सगळ्याचे वाइट परिणाम आई तसेच बाळावर होतात। कुपोषणासाठी बालमृत्यु बाळंतपणातील महिलांचे मृत्यु त्यातून मोठ्या प्रमाणावर होतता त्या अर्थाने पाहिले तर हे दुष्टचक्र च असते ते थांबवण्यासाठी कायदे असले तरी कायद्यातून पळवाटा ही आहेत आणि कायदे करून सगळे प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी जागृति आवश्यक असते।
No comments:
Post a Comment