Friday, 10 April 2015

Maitri

समाजात वावरतना आपल्या खुप ओळखी होतात अनेक कारणाने या ओळखी होत असतात। काही ओळखी या व्यवसायनिमित्ताने होत असतात। काही सामाजिक कार्यनिमित्ताने  असतात। या ओळखीवर आपले समाधान होत नाही या ओळखीच्या लोकांतून आपल्याला मित्र मिळावे अशी आपली धडपड असते ओळखी नेहमी ओपचारिक असतात मित्रांसह आपले जिव्हाळ्याचे संबंध असतात आपल्याला नेहमी आवडी निवडी चा मित्र हवा असतो ज्याच्या आवडी निवडी आपल्या सारख्याच असतात त्यांच्या बरोबर आपल्याला खुप काही संवाद साधता येतो ,चर्चा करता येते ,वाद घालता येतो अशा मित्रांबरोबर आपण खुप हसु शकतो अशा गप्पांमधून खुप आनंद मिळवता येतो आपण नकळत जीवनविषयी खुप काही शिकून घेतो।
          अशा मैत्रीला एक कलात्मक घाट असतो अशी मैत्री स्वार्थ निरपेक्ष असते कोणत्याही बंधनाने ही मैत्री जखडलेली नसते मैत्रीच्या निरामय प्रेमाने ती बांधलेली असते त्या प्रेमाचे कवच जणू प्रत्येकाभोवती असते। 

No comments:

Post a Comment